'रेल सिनेमा : धावत्या आगगाडीच्या कथांचा सिनेमा' प्रीमियर शो
मराठा विद्या प्रसारक समाज संचलित केटीएचएम महाविद्यालयाच्या ॲनिमेशन आणि व्हिडिओ प्रॉडक्शन विभागाने तयार केलेल्या 'रेल सिनेमा: जर्नी थ्रू स्टोरीज ऑन द ट्रॅक' या माहितीपटाच्या (डॉक्युमेंटरी) ‘प्रिमियर शो’प्रसंगी ते बोलत होते. बुधवारी (दि.१०) सकाळी महाविद्यालयाच्या व्हीएलसी सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत या माहितीपटाचे सादरीकरण झाले.
यावेळी शिक्षणाधिकारी डॉ. नितीन जाधव, प्राचार्य डॉ. आर. डी. दरेकर, रेल्वेच्या आयआरआयईईएन विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ. जयदीप गुप्ता, पश्चिम रेल्वेचे मुख्य विद्युत अभियंता जयराम कुर्सिजा आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्राचार्य डॉ. आर. डी. दरेकर यांनी प्रास्ताविक केले. यात त्यांनी ॲनिमेशन आणि व्हिडिओ प्रॉडक्शन विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यानंतर माहितीपटाचे सादरीकरण झाले.
यावेळी ॲड. ठाकरे म्हणाले, ॲनिमेशन आणि व्हिडिओ प्रॉडक्शन विभागाने कोरोना काळात केलेले काम अतिशय कौतुकास्पद असून, त्यावेळच्या व्हिडिओंमुळे शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळले. नेहमीच काहीतरी वेगळे कार्य करणाऱ्या या विभागाकडून आजवर अनेक विद्यार्थ्यांना व्हिडिओ आणि ॲनिमेशनचे शास्त्रशुद्ध शिक्षण मिळाले असून, चित्रपटासह विविध क्षेत्रात ते आपला ठसा उमटवत आहेत. नोकरी आणि व्यावसायिकदृष्ट्या उत्तम संधी असलेल्या या अभ्यासक्रमाला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन ॲड. ठाकरे यांनी केले.
माहितीपटाचे संहिता लेखन सचिन सुशील, दिग्दर्शन डॉ. सौरभ खवले, संपादन जय मोरे आणि खुशाल मुळे यांनी केले. तर पार्श्वध्वनी आदील नूर शेख यांनी दिला आहे. अनिमेशन आणि व्हीएफएक्ससाठी ओंकार जाधव आणि ऍनिमेशन विभागाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. माहितीपटासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व टीमचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनुष्का धागे या विद्यार्थिनीने सूत्रसंचालन केले. डॉ. सौरभ खवले यांनी आभार मानले.
‘रेल सिनेमा : जर्नी थ्रू स्टोरीज ऑन द ट्रॅक’ हा माहितीपट ४० मिनिटांचा असून, हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये तयार करण्यात आलेला आहे. यात भारतीय चित्रपटसृष्टी व रेल्वे यांच्यातील अतूट नाते उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. राजा हरिश्चंद्र, गाईड, शोले, द बर्निंग ट्रेन, जुली, नीलकमल, सदमा, अच्युतकन्या, देवदास, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, गदर, सैराट, रावण अशा ३० ते ४० जुन्या आणि नव्या चित्रपटांमधील रेल्वेचे बहुचर्चित प्रसंग आणि अजरामर गाणी दाखविण्यात आलेली आहेत. रेल्वेट्रॅकवर उलगडणारा इतिहास, संस्कृती आणि वैयक्तिक कथांचा शोध घेण्यात आलेला आहे. सुप्रसिद्ध ऑस्कर विजेते सत्यजित रे निर्मित-दिग्दर्शित अनेक चित्रपटांचाही यात समावेश आहे.
Comments
Post a Comment