Posts

Showing posts from April, 2024

"मैं भी जवां,मेरा दिल भी जवां,कितनी सुहानी रात हैं।तुम पास हो, तुम दूर हो,कितने सितम की बात हैं" - स्मृती विश्वास (जेष्ठय अभिनेत्री)

Image
"मैं भी जवां,मेरा दिल भी जवां,कितनी सुहानी रात हैं। तुम पास हो, तुम दूर हो,कितने सितम की बात हैं" सन १९४०-५० च्या दशकात आपल्या मनमोहक अदाने व अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी ज्येष्ठय अभिनेत्री स्मृती बिस्वास ज्यांनी प्रामुख्याने ग्लॅमरस प्रमुख नायिका होत्या. त्यांच्या काही प्रसिद्ध हिंदी चित्रपटांमध्ये शमशीर (1953), चांदनी चौक (1954), बाप रे बाप (1955), आबे-हयात (1955), भागम भाग (1956), अरब का सौदागर (1956), जगते रहो (1956) यांचा समावेश होतो.  , सैलाब (1956), याहूदी की लडकी (1957) आणि दिल्ली का ठग (1958)  या शिवाय नील आकाशर नीचे (1958) सारखे बंगाली चित्रपट.१९५८ मध्ये डॉक्टर-अभिनेता-निर्माता-दिग्दर्शक एस डी नारंग यांच्याशी विवाह केला.त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत किशोर कुमार, अशोक कुमार, सुनील दत्त, दादा कोंडके,धर्मेंद्र, राज बब्बर,शत्रूगण सिन्हा इ. अशा दिग्गज अभिनेत्यांबरोबर स्मृती विश्वास नारंग यांनी काम केले आहे. आज वयवर्षे १०० पूर्ण केलेल्या स्मृती विश्वास अतिशय वृद्धावस्थेत आणि हलाखीची परिस्थितीत जगत आहेत.

'स्पंदन २०२४' युवा साहित्य महोत्सव महाराष्ट्र विद्यापीठ स्वास्थ्य विज्ञान !

Image
शुक्रवार दि. १९ एप्रिल २०२४ रोजी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक आणि सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटीचे श्रीमती  सुनंदा प्रवीण गंभीरचंद कॉलेज ऑफ नर्सिंग, माटुंगा मुंबई तर्फे  राज्यस्तरीय साहित्यिक कार्यक्रम 'स्पंदन २०२४' या युवा महोत्सवाचे अतिशय भव्य आयोजन करण्यात आले. ज्यात श्री. सचिन सुशील 'सन्माननीय अतिथी' म्हणून आमंत्रित होते,  दोन दिवसीय या स्पर्धेत संपूर्ण महाराष्टतून नर्सिंग, मेडिकल,पॅरा मेडिकल कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांनी या महोत्सवात सहभाग घेऊन आपल्या साहित्यिक व कला गुणांचे सादरीकरण केले. सदर महोत्सवाची सांगता व बक्षीस वितरण समारंभास लेफ्ट. जन. श्रीमती. माधुरी कानिटकर-कुलगुरू (महाराष्ट विद्यापीठ स्वास्थ्य विज्ञान,नाशिक), प्रा.  डॉ.  मिलिंद निकुंभ प्र-कुलगुरू (महाराष्ट विद्यापीठ स्वास्थ्य विज्ञान,नाशिक),डॉ.  नितीन कवडे - उप उप.  कुलसचिव, (प्रशासन),डॉ.  संजय देशमुख-सहाय्यक, कुलसचिव, मुंबई आर.सी, डॉ.  स्वप्नील तोरणे-जनसंपर्क अधिकारी तसेच सेवा मंडळ सोसायटीचे व्यवस्थापन डॉ.  दिलीप त्रिवेदी-अध...