'रेल सिनेमा : धावत्या आगगाडीच्या कथांचा सिनेमा' प्रीमियर शो
मराठा विद्या प्रसारक समाज संचलित केटीएचएम महाविद्यालयाच्या ॲनिमेशन आणि व्हिडिओ प्रॉडक्शन विभागाने तयार केलेल्या 'रेल सिनेमा: जर्नी थ्रू स्टोरीज ऑन द ट्रॅक' या माहितीपटाच्या (डॉक्युमेंटरी) ‘प्रिमियर शो’प्रसंगी ते बोलत होते. बुधवारी (दि.१०) सकाळी महाविद्यालयाच्या व्हीएलसी सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत या माहितीपटाचे सादरीकरण झाले. यावेळी शिक्षणाधिकारी डॉ. नितीन जाधव, प्राचार्य डॉ. आर. डी. दरेकर, रेल्वेच्या आयआरआयईईएन विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ. जयदीप गुप्ता, पश्चिम रेल्वेचे मुख्य विद्युत अभियंता जयराम कुर्सिजा आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्राचार्य डॉ. आर. डी. दरेकर यांनी प्रास्ताविक केले. यात त्यांनी ॲनिमेशन आणि व्हिडिओ प्रॉडक्शन विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यानंतर माहितीपटाचे सादरीकरण झाले. यावेळी ॲड. ठाकरे म्हणाले, ॲनिमेशन आणि व्हिडिओ प्रॉडक्शन विभागाने कोरोना काळात केलेले काम अतिशय कौतुकास्पद असून, त्यावेळच्या व्हिडिओंमुळे शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक न...