आठवणीतले लोकशाहीर विठ्ठल उमप दादा !
....आणि 'दादा' गेले ते कायमचेच ! साल २०१० असेल, माझ्या दोन वर्षांच्या संशोधनातून मी निर्मिती करीत असलेला रेल्वेतील 'गँगमन' कामगारांवर मी करीत असलेल्या माहितीपटासाठी मला शीर्षक गीत लोकशाहीर दिवंगत विठ्ठल उमप दादा यांच्या आवाजात रेकॉर्ड करायचे होते. माझे वडील दि.एस आर पगारे (पत्रकार - सुशील चांदोरीकर) हे मध्ये रेल्वेच्या लेखा विभागात कार्यरत असताना मध्य रेल्वे साहित्य मंडळाद्वारे 'रेलप्रभा' हे रेल्वे कर्मचाऱ्यांचे नियतकालिन मासिक प्रकाशित करत असत.ज्यात रेल्वेसेवेत कार्यरत जेष्ठय साहित्यिक कथाकार वामन ओव्हाळ,दया पवार, ज्येष्ठय कवयित्री हिरा बनसोडे, माधवराव भिडे तसेच अन्य साहित्यिक यांचे लेख,कथा,कविता इ. साहित्य प्रकाशित व्हायचे, अश्याच एका 'रेलप्रभा' मासिकात माझ्या वडिलांचे मध्य रेल्वेतील सहकारी श्री.चंद्रकांत कुलकर्णी (चीफ कामर्शिअल मॅनेजर,कमर्शिअल ऑफिस,मुंबई) यांनी 'रेलप्रभा' या मासिकासाठी लिहून प्रकाशित झालेली त्यांची 'कर्मयोगी' ही कविता कळायला लागलं तेव्हाच वडिलांच्या कागदपत्रांतून काढून वेगळी काढून ठेवली होती. पुढे कर्मधर्म ...