"मैं भी जवां,मेरा दिल भी जवां,कितनी सुहानी रात हैं।तुम पास हो, तुम दूर हो,कितने सितम की बात हैं" - स्मृती विश्वास (जेष्ठय अभिनेत्री)
"मैं भी जवां,मेरा दिल भी जवां,कितनी सुहानी रात हैं।
तुम पास हो, तुम दूर हो,कितने सितम की बात हैं"
सन १९४०-५० च्या दशकात आपल्या मनमोहक अदाने व अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी ज्येष्ठय अभिनेत्री स्मृती बिस्वास ज्यांनी प्रामुख्याने ग्लॅमरस प्रमुख नायिका होत्या. त्यांच्या काही प्रसिद्ध हिंदी चित्रपटांमध्ये शमशीर (1953), चांदनी चौक (1954), बाप रे बाप (1955), आबे-हयात (1955), भागम भाग (1956), अरब का सौदागर (1956), जगते रहो (1956) यांचा समावेश होतो. , सैलाब (1956), याहूदी की लडकी (1957) आणि दिल्ली का ठग (1958) या शिवाय नील आकाशर नीचे (1958) सारखे बंगाली चित्रपट.१९५८ मध्ये डॉक्टर-अभिनेता-निर्माता-दिग्दर्शक एस डी नारंग यांच्याशी विवाह केला.त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत किशोर कुमार, अशोक कुमार, सुनील दत्त, दादा कोंडके,धर्मेंद्र, राज बब्बर,शत्रूगण सिन्हा इ. अशा दिग्गज अभिनेत्यांबरोबर स्मृती विश्वास नारंग यांनी काम केले आहे. आज वयवर्षे १०० पूर्ण केलेल्या स्मृती विश्वास अतिशय वृद्धावस्थेत आणि हलाखीची परिस्थितीत जगत आहेत.
Comments
Post a Comment