मरिना अब्रामोविक (जागतिक मॉडेलिंग आणि पेरफॉरमिंग आर्टस् क्षेत्रातील जगप्रसिद्ध नाव...जिने तिच्या एका परफॉर्मन्समध्ये जमलेल्या लोकांना त्यांच्या वागण्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीची जाणीव करून दिली)
मरिना अब्रामोविक
(मॉडेलिंग आणि पेरफॉरमिंग आर्टस् क्षेत्रातील जगप्रसिद्ध नाव...जिने तिच्या एका परफॉर्मन्समध्ये जमलेल्या लोकांना त्यांच्या वागण्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीची जाणीव करून दिली)
मूळची यूगोस्लोवकिया नागरिकत्व असलेली ही मॉडेल तिच्या विविध पेरफॉरमिंग एक्सपरिमेंट्स अँड रिसर्च साठी जगविख्यात आहे. तिला 'मदर ऑफ परफॉर्म' म्हटले जाते.
तिच्या 'रॅशनल बिहेवीअर' अँड 'रॅशनल बॉडी लँग्वेज' या एक्सपरिमेंटल मधील अनेक परफॉर्मन्स पैकी सर्वात पहिला 'रिदम 0' हा परफॉर्मन्स अतिशय जगप्रसिद्ध आहे.
१९७४ मध्ये इटली येथे तिने पहिला परफॉर्मन्स दिला. त्यात तिने सुमारे सहा तासासाठी उपस्थित असलेल्या लोकांपुढे 'ऑब्जेक्ट' (वस्तू) म्हणून स्तब्ध उभे राहून लोकांना आपल्या बरोबर पाहिजे ते करण्याची मुभा दिली आणि सोबतच त्या परफॉर्मन्स मध्ये जे काही घडेल याची जवाबदारी तिने स्वतःवर घेतली. दरम्यान तिने एका टेबलावर ७२ वस्तू ठेवल्या ज्यात गुलाबाची फुले,परफुम्स,चॉकलेट्स,साखळी,ब्लेडस,काटेरी झुडूप,पिस्तुल अश्या वस्तूंचा समावेश होता. रात्री आठ वाजता तिने उभी राहून पोझिशन घेतली. सुरवातीला तिथे उपस्थित असलेल्या लोकांपैकी काही फोटोग्राफर्स पुढे आले त्यांनी फोटो काढण्यास सुरवात केली. त्यानंतर हळू हळू इतर लोक पुढे येऊन तिला स्पर्श करू लागले,तिच्या शरीराशी खेळू लागले,तिच्या अंगावरील कपडे काढून तिला नग्न केले,काहींनी तिच्या स्तनांना आणि इतर ठिकाणी हाताने,तोंडाने स्पर्श केले.काहींनी तिला नंतर एका जागेतून दुसऱ्या जागी हलवले,तिला साखळीने बांधले,तिच्या अंगावर काटे बोचले,ब्लेडने गळ्यावर कापले तसेच तेथील उपस्थित एका व्यक्तीने तिच्या हातात पिस्तुल देऊन तिच्यावरच धरायला लावले. सुमारे सहा तास चाललेला हा परफॉर्मन्स अखेरीस रात्री दोन वाजता संपला आणि वेदनामयी अंगाने आणि अश्रूभरलेल्या डोळ्यांनी मरिनाने हॉल मध्ये चालायला सुरुवात केली.
ती तेथील प्रत्येक व्यक्तीसमोर उभी राहिली ज्याने तिच्या सोबत शक्य तितके अनुभव घेतले.अखेरीस ती त्या व्यक्तीसमोर उभी राहिली जिने तिच्या मानेवर ब्लेडने चिरले आणि तिच्या हातात पिस्तुल देऊन तिच्यावर धरण्यास प्रवृत्त केले.परंतु त्यावेळी तो व्यक्ती तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नव्हता.त्याला त्याच्या कृत्याबद्दल अतिशय लाज वाटली आणि तो रडू लागला.
वरील परफॉर्मन्स मध्ये मरिनाने लोकांसमोर हे मांडले की, असह्य-दुबळ्या व्यक्तींना शक्य तितका त्रास देण्यास इतर लोकांना अतिशय आनंद होतो. त्यावेळी ते एखाद्याच्या जीवाशी खेळतात. त्यामुळे जातीय दंगे, मारामाऱ्या, भांडण यामध्ये लोक असाह्य व्यक्तींना वेदना पोहचवतात.
या एक्सपरिमेन्ट ने तिथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांना त्यांच्यातील गुन्हेगार वृत्तीची जाणीव करून दिली.
तिच्या अनेक परफॉर्मन्स पैकी वरील परफॉर्मन्स अत्यंत लोकप्रिय आहे आणि त्याद्वारे मानसशास्त्रीय उपचारात या थेअरीचा वापर केला जातो.
या परफॉर्मन्स बद्दल अनेक विडिओ युट्युबवर उपलब्ध आहेत. तसेच मरिनाची संक्षिप्त माहिती विकिपीडिया वर उपलब्ध आहे...नक्की वाचा...
- © सचिन सुशील.
Comments
Post a Comment